माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये राष्ट्रीय डॉक्टर डे उत्साहात साजरा
आपला ई पेपर/परळी /
प्रतिनिधी –
राष्ट्रीय डॉक्टर डेच्या निमित्ताने माऊंट लिटेरा झी स्कूल, परळी येथे एक भव्य आणि प्रेरणादायी सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात परळीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवर डॉक्टरांचा सन्मान करून त्यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
या विशेष सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र वंगे यांनी भूषविले. त्यांच्या समवेत संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. कैलास घुगे आणि प्राचार्य मंगेश काशिद यांच्या हस्ते उपस्थित डॉक्टरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात
डॉ. हरिश्चंद्र वंगे दादा, डॉ. अरुण गुट्टे, सौ.डॉ. शालिनीताई कराड, डॉ. बालासाहेब कराड, डॉ. रुद्राक्ष, डॉ. विवेक दंडे, डॉ. सूर्यकांत मुंडे, डॉ. मधुसूदन काळे व सौ. अनुराधा काळे, डॉ. मंगेश गीते, डॉ. कुणाल जैन, डॉ. सौ. स्वप्निता गुट्टे, डॉ. पाळवदे, डॉ. लक्ष्मीकांत लोहिया व सौ. लोहिया, डॉ. राजेश जाजू, डॉ. दिनेश लोढा,डॉ. सौ. वैशालीताई, डॉ. भावटनकर, डॉ. रविकुमार फड, सौ फड यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डॉक्टरांविषयी आपल्या भावना व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी माउंट लिटेरा झी स्कूलचे उपाध्यक्ष
प्रा.कैलास घुगे सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉक्टर हा केवळ व्यवसाय नसून, तो मानवतेची निःस्वार्थ सेवा करणारा धर्म आहे. त्यांच्या हातून दररोज जीव वाचतात, म्हणून ते खरे अर्थाने देवदूतच आहेत.असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, प्राचार्य मंगेश काशिद यांनीही विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी स्वरूपात पार पडले. शाळेच्या सामाजिक बांधिलकीचा भान राखत, अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षणाची रुजवणूक होत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
Social Plugin