विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी दंत चिकित्सा गरजेची- प्रा.कैलास घुगेसर
आपला ई पेपर/परळी / प्रतिनिधी
माऊंट लिटरा झी स्कूलमध्ये डॉक्टर डे च्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासा सोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी ही सुद्धा महत्त्वपूर्ण बाब आहे. म्हणूनच माऊंट लिटरा झी स्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या दंत चिकित्सा सोबतच आरोग्याची तपासणी करण्यात आली. सध्या फास्ट फूडचा जमाना असून यामुळे मुलांच्या दातांवर परिणाम लवकर होतो. त्यामुळे त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे या उद्देशाने दंत आरोग्य चिकित्सा शिबिर घेतल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक कैलास घुगे सर यांनी दिली आहे.
विद्यार्थी हा भारत देशाचा आधारस्तंभ असून तो आधारस्तंभ बालपणा पासूनच आरोग्यमय होण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे या पार्श्वभूमीवर हे आरोग्य शिबिर आवश्यक असून आज झालेला आरोग्य शिबिराचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.असे मत परळीतील जैन दंत रुग्णालयाचे वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध दंततज्ञ डॉ.दिनेश लोढा यांनी व्यक्त केले आहे.
यात 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यावेळी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दंत चिकित्सा आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Social Plugin