II प्रा. कैलास घुगे सर एक शिक्षक नव्हे, तर शिल्पकार- कु. सिद्धी टिंबे
एक गुरु शिष्याला केवळ यश मिळवून देत नाही, तर त्याला आयुष्यभरासाठी मार्ग दाखवतो.
Aplaepaper /online
परळी / प्रतिनिधी
प्रा. कैलास घुगे सर हे केवळ शिक्षक नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे शिल्पकार आहेत. त्यांच्या शिकवणीत फक्त अभ्यासक्रम नव्हे, तर जिद्द, आत्मविश्वास, आणि संघर्षातून यश गाठण्याची कला असते.असे मत
नीट 2025 परीक्षेत 557 गुण मिळवत यश मिळविलेल्या कु सिद्धी अनंत टिंबे हिने लोकराजा छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त माऊंट लिटेरा झी स्कूलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
माऊंट लिटेरा झी स्कूलमध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात कु. सिद्धी हिचा भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमांस संस्थेचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र वंगे, प्राचार्य डॉ. मंगेश काशिद सर, डॉ. अनंत टिंबे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपास्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी कु. सिद्धी टिंबे हिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, या यशामागे माझं कष्ट तर आहेतच, पण त्याहूनही मोठं योगदान आहे ते माझे गुरू प्रा. कैलास घुगे सरांचं. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्यच नव्हतं. असे मनोगत तिने यावेळी व्यक्त केले.घुगे सर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करत असतानाच, त्यांच्या मानसिक ताकदीकडेही तितकंच लक्ष देतात. "तू करू शकतेस" या एका वाक्यानं अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात नवं उजाडलंय सिद्धी हे त्याचं जिवंत उदाहरण असल्याचेही तिने यावेळी सांगितले.
पालकांचं कृतज्ञ मनोगत
या प्रसंगी सिद्धीचे पालक डॉ. अनंत टिंबे यांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू होते. आमच्या मुलीला योग्य दिशेने घडवलं, तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि तिच्यातील सर्वोत्तम आणून दिलं यासाठी आम्ही घुगे सरांचे सदैव ऋणी आहोत,असे भावूक उद्गार त्यांनी काढले.
विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश
सिद्धीने आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी संदेश दिला. स्वप्न मोठं असावं, मेहनत प्रामाणिक असावी आणि मार्गदर्शन योग्य व्यक्तीकडून मिळालं, की यशाचे शिखर गाठता येते. तिच्या या शब्दांनी उपस्थित सर्वांची मने जिंकली.
सत्कार सोहळा स्मरणीय ठरला
या कार्यक्रमात कु.सिद्धीचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि टाळ्यांच्या कडकडाटात सत्कार करण्यात आला. तिच्या यशकथेने विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण केला.
एक गुरु शिष्याला केवळ यश मिळवून देत नाही, तर त्याला आयुष्यभरासाठी मार्ग दाखवतो.
Social Plugin