परळी /प्रतिनिधी
परळीत शैक्षणिकदृष्ट्या विकास व्हावा येथील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे सखोल ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी नव्यानेच उभी करण्यात आलेली स्कूल, पुणे, मुंबई आधी ठिकाणीच् आधुनिक संकल्पनेतून चालत असलेल्या झी ग्रुप च्या माध्यमातून परळी मध्ये माऊंट लिटेरा झी स्कूलची उभारणी करण्यात आली.
यामुळे या स्कूलच्या माध्यमातून अनेक पालकांच्या समस्या व विद्यार्थ्यांना पुणे मुंबईच्या धर्तीवरील शैक्षणिक विकास परळीत मिळत असल्यामुळे माऊंट लिटेरा झी स्कूलचे अध्यक्ष सुप्रसिद्ध डॉक्टर हरिश्चंद्र वंगे (दादा), संस्थेचे उपाध्यक्ष कैलास घुगे सर, प्राचार्य मंगेश काशीद सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे परळीतील पालकांनी शाल श्रीफळ देवून कौतुक करत स्वागत केले.
आज दि 27 शुक्रवार रोजी गंगाखेड रस्त्यालगत असलेल्या माऊंट लिटेरा झी स्कूल मध्ये आयोजित एका छोट्या कार्यक्रमात बोलताना पालक म्हणाले की, आम्ही सर्व पालक सदैव आपल्या सोबत आहोत. आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि परळीच्या शैक्षणिक विकासासाठी आपण उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे ही भावना प्रकट करत संस्थेतील विश्वस्तांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर लक्ष्मण कोंडावार, प्रदीप बुकतर, वसीम शेख, असीम शेख, राहुल वाळके, सतीश फड, केतन चिलरगे, कैलास लोखंडे, सय्यद माजिद, राजकुमार सोनी, दिनेश बिडगर, मनोज जाजू, निवृत्ती मुंडे आदी पालकांचे प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
Social Plugin