आपला ई पेपर/online/परळी प्रतिनिधी
परळीच्या मध्यवर्ती ठिकाणी उभे असलेल्या पन्नास वर्षांहूनही अधिक काळापासून राणी लक्ष्मीबाई टॉवर म्हणजे परळीकरांचे कौतुकाचे अभिमानाचे यशस्वी ठिकाण याच परळीचा केंद्रबिंदू राणी लक्ष्मीबाई टावर आज परळी नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांमुळे ऐतिहासिक ठेवा नष्ट होत असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आहे. अशी खंत परळीतील सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून खंत व्यक्ती केली आहे
आज सकाळी पडला आहे. हे टॉवर परळीची शान आहे. मात्र सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली फक्त रंगीत फरशी यावर चिटकवण्या खेरीज शहराची जबाबदारी असणाऱ्या नगरपरिषदेने कधीही या टॉवर चे भविष्यात जतन व्हावे या दृष्टीने काहीही केलेले नसल्याने आज ही वेळ आली आहे.
पुरातन ठेवा जपावा, सुरक्षित रहावा यासाठी याचे मजबुतीकरण करण्यासाठी अनेक आधुनिक पध्दती आहेत. त्या पद्धतीने हा शहरातील अनमोल ठेवा जपला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करताना बांधलेल्या ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराच्या पूर्व घाटाच्या 241 वर्षांपूर्वीच्या पायऱ्याही नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे पाडल्या गेल्या.
50 कोटींच्या सरंक्षक भिंत बांधण्याच्या कामासाठी व शॉपिंग कॉम्प्लेक्स वाचवण्यासाठी पुरातन सरस्वती नदीला नाला ठरवण्याचा प्रयत्न परळी नगरपरिषद करत आहे. अश्या अनेक गोष्टींमुळे शहराचा पुरातन वारसा संपून जाईल.
आताही प्रत्येक परळीकरांच्या ह्रदयात स्थान असलेल्या या राणी लक्ष्मीबाई टॉवर चे जतन व्हावे, त्याचे मूळ स्वरूप न बदलता मजबूती करण व्हावे यासाठी नगरपरिषदेने त्वरित पाऊले उचलणे गरजेचे आहे. प्रत्येक परळीकरांनी हे टॉवर टिकले पाहिजे यासाठी नगरपरिषदेकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. नाहीतर परळी नगरपरिषद तयारच आहे, हे पाडून नवीन काम काढून गुत्तेदार पोसायला.
राणी लक्ष्मीबाई टॉवर हे टिकले पाहिजे.
*परळीत रेल्वे उड्डाणपूल 30 जून पर्यंत बंद राहणार ! वाहतुकीसाठी परळी बायपास रोडचा पर्याय* | https://aplaepaper.blogspot.com/2025/05/blog-post.html
Social Plugin