आपला ई पेपर परळी वैजनाथ प्रतिनिधी
येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका छाया देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महात्मा फुलें यांच्या प्रतिमेला संस्थेच्या संचालिका छाया देशमुख, प्राचार्या डॉ .विद्या देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रा . फुटके यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षण विषयक व सामाजिक कार्याचा विस्तृत आढावा घेतला. कार्यक्रमास प्रा डॉ अरुण चव्हाण, डॉ राजश्री कल्याणकर,प्रा डॉ विलास देशपांडे,प्रा डॉ राजकुमार यल्लावाड,प्रा डॉ रंजना शहाणे, प्रा डॉ वर्षा मुंडे, प्रा प्रवीण फुटके, प्रा प्रवीण नव्हाडे, विकास देशपांडे व कल्याणी पत्की आदिंची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा फुटके यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी वर्ग उपस्थित होता .
Social Plugin