आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
थोर विचारवंत,भारतिय समाजात समतेच्या क्रांतीची महुर्तमेढ रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या कार्याबरोबरच भारतीय समाजात समानता यावी यासाठी विपुल साहित्यसंपदा लिहुन ठेवली आहे.त्यांच्या या साहित्याचे आजच्या तरुण पिढीने वाचन केले तर समाजात समता प्रस्थापित होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल असे प्रतिपादन दै.दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी धनंजय आढाव यांनी केले.
परळी शहरातील राजा भृतरीनाथ टंकलेखन संस्थेत संचालक एन.बी.भोकरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जागृती ना.सह.पतसंस्थेचे व्यवस्थापक सुधाकर शिंदे,सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डाके हे उपस्थित होते.प्रास्ताविकात राजकुमार डाके यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी सविस्तर माहिती सांगितली.यावेळी बोलताना धनंजय आढाव यांनी ज्योतिबा फुले यांची कौटुंबिक व सामाजिक कार्याची माहिती सांगताना त्याकाळी महिलांना मिळणारी वागणुक,शिक्षण व सार्वजनिक क्षेत्रात असलेली बंधने मोडीत काढण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते.भारतिय समाजात समानता यावी यासाठी लेखन करुन समाजजागृती केली.त्याच्या या कार्यामुळेच आज महिलांसह समाजातील दुर्लक्षित घटकास शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे.आजच्या युवापिढीने सोशल मीडियावर इतर अनावश्यक गोष्टींकडे असलेले लक्ष कमी करुन फुलेंचे साहित्य वाचण्यावर भर द्यावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन राजा भृतरीनाथ टंकलेखन संस्थेचे संचालक एन.बी.भोकरे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.याच कार्यक्रमात मुकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दल धनंजय आढाव यांचा सत्कार करण्यात आला.
Social Plugin