Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सर्वत्र चर्चेचा विषय |परळीकरांचा स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी याद्वारे साध्य होत आहेत याचा मनस्वी आनंद होतोय...



आपला ई पेपर परळी वैजनाथ प्रतिनिधी
बीड जिल्हा म्हटलं की सध्या सर्वत्र दहशत आणि बदनामीचा काळ प्रत्येकास अनुभवास मिळत आहे अशा परळीचा म्हटलं तर लोकं पायापासून डोक्याच्या केसांपर्यंत विलक्षणपणे पाहतात..
 परळीकरांच्या निसर्ग प्रेमाचे कौतुक सध्या सर्वत्र होत आहे. शरीरासाठी व्यायाम आवश्यक आहे आणि व्यायामासाठी मन प्रसन्न असणे गरजेचे आहे मन प्रसन्न करणाऱ्या पहाटेच्या वेळी भुकेलेल्या तहानलेल्या मुक्या प्राण्याला आपली मदत हवी असते ती मदत करणारे परळीकर हे सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे माणुसकीचा भाग म्हणून प्राण्यांचे आणि निसर्गाची जोपासना करणारे हे मित्रमंडळी आज सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.



मागील दोन वर्षापासून मार्च 2023 म्हणजेच साधारणपणे परळीच्या मेरुगिरी पर्वताच्या मागील बालाघाटच्या डोंगरातील झाडीत दररोज पहाटे मॉर्निंग वॉक साठी साधारणपणे साडेतीन किलोमीटर जाणे व परत येणे असा सात किलोमीटरचा फेरफटका मारणे हा ...

नित्यक्रम. मागच्या वर्षी मार्चमध्ये असाच कडक उन्हाळा होता, डोंगरावर अनेक प्राणी उदा. मोर, हरिण ,ससे ,विविध पक्षी यांचा मुक्त वावर पहावयास मिळतो.

परंतु कडक आणि रणरणत्या उन्हाळ्यात डोंगरावरील पूर्ण पानवठे आटले होते, पशुपक्षांना चारा पाणी व अन्नाची उपलब्धता नव्हती, बिचारे पशुपक्षी अन्न व पाण्याविना कासावीस झालेले पाहिले ,व आपण या भुकेल्या व तहानलेल्या पशुपक्ष्यांसाठी अन्न पाणी व चाऱ्याची व्यवस्था करावी अशी कल्पना आम्हा सदस्यांच्या डोक्यात आली व लगेच दुसऱ्या दिवसापासून डोंगरावर असलेले पंचवीस लिटर क्षमतेचे तीन सिमेंटचे कुंड भरण्यासाठी दररोज दहा व पाच लिटरचे पाण्याचे कॅन तसेच वाटाणे ,हरभरे ,चवळी, रात्री भिजवून तसेच ज्वारी, गहू ,तांदूळ ,घरात उरलेले अन्न, भाजी मंडईतून मुद्दाम आणलेले टोमॅटो ,काकडी, खरबूज, पत्ता कोबी ,वांगे इत्यादी खाद्यपदार्थ आलटून पालटून पशुपक्ष्यांसाठी खांद्यावर घेऊन जाणे व त्यांची तहान व भूक भागवण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत.








आज भरलेल्या पाण्याच्या कुंडात उद्या एक थेंबही उरत नाही तसेच आज टाकलेले अन्न व धान्याचा कण ना कण पक्षी वेचून खातात हे निदर्शनास आले आहे. आता तर आम्ही अन्न व पाण्यासह पहाटे डोंगरपट्ट्यात पोहोचताच मोर म्याओ , म्याओ असा आवाज करत आमचे जणू स्वागतच करतात की काय? असे वाटते. मोर, हरीण, पक्षी यांच्यासोबत आमची मैत्री झाल्यासारखी वाटते. मोर हरीण व पक्षांचा स्वच्छंद वावर आमच्या नजरेसमोर होताना पाहून आठ दहा किलो वजन वाहून नेण्याचा शीण कुठल्या कुठे निघून जातो .पण एक मात्र खरे की, रात्र झाल्यावर कधी दिवस उजाडेल व कधी आमची त्या मूक प्राण्यांची भेट होईल असे होते. त्यानिमित्ताने आमचा दररोज सात आठ किलोमीटर चालण्याचा व्यायामही होतो. चालण्याच्या व्यायामाने आमचे आयुष्य चार दोन वर्षांनी वाढावे हा स्वार्थ ही त्यामागे आहे ........

असो, स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी याद्वारे साध्य होत आहेत याचा मनस्वी आनंद होतोय..... आज टिपलेली पशुपक्ष्यांची काही क्षणचित्रे.