आपला ई पेपर परळी online
केज येथील अपहरण व अत्याचार घटनेनंतर परळीत एका नामांकित प्रतिष्ठित व्यापाऱ्याला रात्रीच्या वेळी भर वस्तीतून अपहरण करून आंबेजोगाई येथील घाटात घेऊन जाऊन दमदाटी करत त्यांच्याकडून खंडणीची मागणी केल्याची प्राथमिक माहिती गोपनीय सूत्राकडून मिळाली आहे.
याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, परळी शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापारीपेढी आहे. नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात पाच ते सहा जणांनी त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले. व अंबाजोगाईच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान, त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो, असे त्यांना सांगण्यात आले. घाबरून जाऊन अमोल डुबे यांनी गळ्यातील सोन्याची चैन, जवळील रक्कम व आपल्या ड्रायव्हरला फोन लावून काही रक्कम आणून अपहरणकर्त्यांना दिली. त्यानंतर अंबाजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेच्या पुढे गेल्यानंतर या अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडून देऊन ते पसार झाले.
चार ते पाच जण तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आले होते. अपहरणाची घटना ऑफिसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. परंतु, या घटनेने व्यापारी व परळी शहरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी आता परळी शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने व्यापारी, नागरिक जमा झाले असुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
✨⭐YouTube
*🔴Breaking |न्यूज |हेडलाईन*
*🔴दै.लोकप्रश्न परळी प्रतिनिधी*
✨⭐
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
*🔴संतोष बारटक्के*
*🔴9423472426
Social Plugin