Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात वार लातूर रोडवर ट्रकची कारला जबर धडक

 आपला ई पेपर online 


बीडच्या अंबेजोगाई जवळ लातूर रोडवर वाघाडपाटी येथे ट्रकची कारला जबर धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती की कार इंजिनासकट चेपली. कारमध्ये असणाऱ्या चालकासह एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात काही जण जखमीही झाल्याचे वृत्त असून जखमींवर उपचार सुरु आहेत. मंगळवारी पहाटे हा अपघात झाला असून या अपघातात कारचा चुराडा झाला. यावेळी परिसरातील नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. घटनेत दोन जण जागीच गेल्याने मोठी खळबळ उडाली असून मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. या अपघाताचा तपास सुरु झाला असून जखमींवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत कुर्ला अपघातात 5 मृत्यू, 35 गंभीर जखमी

मुंबईतल्या कुर्ला बेस्ट अपघातात (Kurla Best Bus Accident) 5 जणांचा मृत्यू झाला आहे. काल (9 डिसेंबर) रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. ही धडक एवढी तीव्र होती की यात 5 जणांचा मृत्यू झालाय. 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

✨⭐
YouTube
*🔴Breaking |न्यूज |हेडलाईन*
*🔴दै.लोकप्रश्न परळी प्रतिनिधी*
✨⭐
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
*🔴संतोष बारटक्के*
*🔴9423472426*

प्रत्यक्षदर्शीने सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरार-

सदर बसने 7 ते 8 गाड्यांना उडवलं. यामध्ये दोन ते तीन रिक्षा होत्या. त्यानंतर दोन टेम्पो आणि गाड्यांना उडवत बस मार्केटमध्ये घुसली. कितीजण जखमी झाले याबाबत माहिती नाही, पण अपघात झाला तेव्हा एक महिलेचा जागेवरच मृत्यू झाला होता. ती महिला बस आणि एका गाडीच्यामध्ये अडकल्याने तिचा मृत्यू झाला. काही मुलांना लगेच बाहेर काढलं. त्यानंतर मार्केटजवळ दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता.