केज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबरोबरच खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात बीडच्या एलसीबीने ही कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णू चाटे यास बीड जिल्ह्यातूनच अटक करण्यात आलेली आहे
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विष्णू चाटेवर गुन्हा दाखल होता. तसेच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही विष्णू चाटे आरोपी आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय घेतला जाऊ लागला होता. अखेर विष्णू चाटेला बेड्या ठोकण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, खून प्रकरणातील अन्य तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.
Social Plugin