परळी प्रतिनिधी/आपला ई पेपर online
परळी शहरातील युवा प्रतिष्ठित व्यापारी अमोल विकासराव दुबे यांचे अपहरण करून त्यांच्याकडून काही रक्कम घेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते.
याप्रकरणी पोलिसांनी तपासासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आले होते.या पथकातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी पुणे, अहमदनगर या ठिकाणी रात्रंदिवस एक करून तब्बल चार दिवस या प्रकरणातील अपहरणकर्त्या आरोपींना मुद्देमालासह पकडले.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी परळीत पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना माहीती दिली. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी, एक रिवॉल्वर सह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले की,अमोल विकासराव डुबे रा. टेलर लाईन परळी .ता. परळी जि. बीड, यांनी फिर्याद दिली की, दि 09 डिसेंबर रोजी रात्री 9 ते 11.30 वा. दरम्यान अनोळखी पाच व्यक्तींनी तोंडाला रुमाल बांधुन येवुन त्यांची मोटारसायकल अडवली. नंतर त्यांना गाडीत टाकुन जबरदस्तीने घेवुन जावून बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर कन्हेरवाडी जवळ असलेल्या आंबेजोगाई घाटात घेवून जावुन त्यांच्याकडुन खंडणी म्हणून त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम 3,88,300 रुपये घरच्यांना फोन करून 10 तोळे सोन्याचे बिस्कीट किंमत अंदाजे 4,00,000 रुपये असा एकूण 8,28,300 रुपयाचा माल घेवून प्रतिष्ठित व्यापरी हा अमोल डुबे यांना घाटातच सोडण्यात आले
तपासी अंमलदार धनंजय ढोणे (पोलीस निरीक्षक संभाजी नगर, परळी वै,) यांनी तपास केला. आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळी तपास पथके तयार करुन तांत्रिक माहिती घेवून व गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेवून गुन्हा उघडकीस आणला.
या गुन्हयात आरोपी चैतन्य पंढरी उमाप (वय 24 ) रा. पळसखेडा ता. केज जि. बीड ह.मु. परळीवेस, अंबाजोगाई जि बीड, सागर ऊर्फ बबलु शंभु सुर्यवंशी (वय 22) रा. आंबेडकर चौक आनंदनगर लातुर ह.मु. परळीवेस अंबाजोगाई, शंकर भगवान जोगदंड (वय 22) रा. साठे नगर परळीवेस ता. अंबाजोगाई ,सचिन श्रीराम जोगदंड (वय 25) रा. साठे नगर परळीवेस ता. अंबाजोगाई , जय ऊर्फ सोनू संजय कसबे (वय 26) रा. सिध्दार्थ नगर परळी वै यांना अटक करण्यात आली.
फिर्यादीकडून खंडणीपोटी घेवुन गेलेले 10 तोळे सोन्याचे बिस्कीट व रोख रक्कम 112,000 रुपये जप्त करण्यात आली आहे. गुन्हयात फिर्यादीचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली कार स्वीफ्ट डीझायर किंमत 2,00,000 रुपये व टाटा पंच किंमत 6,00,000 रुपये असा एकुण 17,12,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. आरोपी सचिन श्रीराम जोगदंड याचे ताब्यातुन गुन्हयात वापरण्यात आलेला गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. गुन्हयाचा मास्टर माइंड जय संजय कसबे याची गोपनीय माहिती मिळवुन तपास पथकाने त्याला पुणे येथे अटक केली आहे.
ही कामगीरी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, सहा. पोलीस निरीक्षक योगेश शिंदे ,सहा. पोलस निरीक्षक नितीन गड्डवार, पोह. नरहरी नागरगोजे,पोह. बालाजी दराडे, पोह. भास्कर केंद्रे, पोह. गोवींद येलमटे, पोह. अंकुश मेंडके, पोना. गोवींद भताने ,पोअं. पंडीत पांचाळ, IT सेल बीड चे पोअं. वीक्की सुरवसे यांनी पार पाडली आहे.
गुन्हयाच्या तपास पथकाला 25 हजाराचे बक्षीस
दरम्यान या बहुचर्चित गंभीर गुन्ह्यात चोख कामगिरी बजविणाऱ्या पो.नि. धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाला या कामगिरीबद्दल 25 हजार रुपये रोख रकमेचे बक्षीस जाहीर करण्यात आले. या बक्षिसाची रक्कम सन्मानपूर्वक जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या हस्ते या तपासी पथकाला सुपूर्द करण्यात आली.
News🔴Breaking |न्यूज |
*परळी पोलिसांच्या जलद तपास कामगिरीची वरिष्ठांना कडून कौतुक*
वाचा सविस्तर संपूर्ण बातमी
*अमोल डुबे अपहरण प्रकरणातील सोन्याची बिस्किट व गावटी पिस्टल पाच आरोपी जेरबंद*
🔴👇👇👇
https://aplaepaper.blogspot.com/2024/12/blog-post_16.html
*Video News🔴Breaking |न्यूज |आरोपी अटक |अमोल डुबे अपहरण प्रकरणातील सोन्याची बिस्किट व गावटी पिस्टल हस्तगत*
🔴👇👇👇https://youtu.be/bi64rVbhAto?si=B2iP4_s324I8hzIJ
✨⭐
YouTube
*🔴Breaking |न्यूज |हेडलाईन*
*🔴दै.लोकप्रश्न परळी प्रतिनिधी*
✨⭐
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
*🔴संतोष बारटक्के*
*🔴9423472426*
https://aplaepaper.blogspot.com
Social Plugin