शिवमहापुराण कथेस महाराष्ट्रातुन भाविकांची उपस्थिती
आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
कलियुगात दान करणारांची संख्या वाढत असली तरी शुध्द हेतुने दान करणारे दुर्मिळ होत चालले आहेत.दान करताना परोपकारी वृत्ती महत्वाची आहे आणि यातुनच शिवभक्ती व आत्मोन्नती साधता येते असे प्रतिपादन प.पु.कनकेश्वरी देवीजी यांनी हालगे येथे केले.
पंचम ज्योतिर्लिंग परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात शुक्रवार दि.८ नोव्हेंबर रोजी माता कनकेश्वरी देवीजी कथेचे तिसरे पुष्प गुंफताना भगवान शंकराचे अनेक रूप व अवतार आहेत कलियुगात अधर्मापासून दूर राहण्यासाठी संतांच्या रूपाने शिवशंकर आपल्यामध्ये कायम सहवासात असतात शिवमहापुराणात ज्योतिर्लिंग क्षेत्रांना अधिक महत्त्व असून जो शिवाजी मनोभावे भक्ती करतो त्या भक्तांच्या जीवनातील अनेक संकटे दूर होतात परंतु शिवभक्ती कशी करावी हे आजकाल काही जण वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात यात मत मतांतरे आहेत. जे जे पाखंडी आहेत त्यांना कधीच शिवमहिमा कळत नाही उलट एखाद्या गुरुने सांगितलेली शिवमहिमा ध्यानपुर्वक ऐकणारा शिष्यच अशा या पाखंडी लोका पेक्षा श्रेष्ठ आहे.शिव हा विनाशकर्ता आणि पुनर्संचयित करणारा,महान तपस्वी आणि कामुकतेचे प्रतीक,आत्म्यांचा परोपकारी पाळणारा आणि क्रोधित बदला घेणारा असा सर्वव्यापी असल्याचे सांगितले.
@हाराष्ट्रातुन भाविकांची उपस्थिती
प.पु.कनकेश्वरी देवीजी यांचा भक्तवर्ग मोठा असुन परळी येथे होत असलेल्या शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन भाविक परळीत दाखल असुन कथा श्रवणाबरोबरच पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ परिसर फुलून गेला आहे.आयोजक सौ.जयश्रीताई प्रभु कोरे हिंपळनेकर,लातुर व पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ शिवकथा समिती,परळी वैजनाथच्या वतीने भाविकांची चोख व्यवस्था करण्यात येत आहे
*PARLI 233 मतदारांमध्ये...*
*58 गावांमध्ये होणार होम वोटिंग, 14 पथकांची नियुक्ती, दिव्यांग मतदारांसाठी विशेष उपाययोजना*
|🔴👉👉👉 https://aplaepaper.blogspot.com/2024/11/parli-233-58-14.html
*आपला ई पेपर परळी*
*💥💥संतोष बारटक्के 9423472426*
*संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात...
👍💥💥💥
https://aplaepaper.blogspot.com/2024/11/139-31-11.html
Social Plugin