Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

#PARLI-BEED I बीड 31,तर परळीत 11 उमेदवार रिंगणात कायम,...

 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये 139 उमेदवार रिंगणात कायम,...बीड 31,तर परळीत 11 उमेदवार


 




आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 

संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्त्वपूर्ण असणारी बीड व परळी विधानसभा मतदारसंघ यांच्या लढतीची आकारण्यात आलेले गनिमी कावा विविध चर्चेला आज पूर्णविराम झाल्याचे दिसत आहे.

माजी कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्यातच थेट लढत होणार.


बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली या दरम्यान वैध ठरलेल्या 377 उमेदवारांपैकी २३८ उमेदवारांनी माघार घेतली आहे.


आता सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 139 उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत.. 

गेवराई मतदार संघात 21, 

माजलगाव मतदार संघात 34, 

बीड 31, 

आष्टी 17, 

केज 25, 

परळी 11,

याप्रमाणे उमेदवारी अर्ज कायम असून सहा मतदार संघात 139 उमेदवार आता नशीब आजमावणार आहेत.



• परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

1. धनंजय पंडितराव मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

2. राजेसाहेब किशनराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

3. धोंडीराम लक्ष्मण उजगरे बहुजन समाज पक्ष

4. केदारनाथ वैजनाथ जाधव पीजेन्टस् अॅन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया

5. भागवत बबनराव वैद्य विकास इंडिया पार्टी

6. साहस पंढरीनाथ आदोडे मराठवाडा मुक्ती मोर्चा

7. अल्ताफ खाजामिया सय्यद अपक्ष

8. दयानंद नारायण लांडगे अपक्ष

9. राजेसाहेब उर्फ राजाभाऊ सुभाष देशमुख अपक्ष

10. शाकीर अहमद शेख, अपक्ष

11. हिदायत सादेकअली सय्यद अपक्ष