आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
इयत्ता दहावीत शिकत असलेल्या लिंबोटा तांडा येथील ऊसतोड मजुराच्या मुलाचा खदानीतल पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली.
परळी तालुक्यातील लिंबोटा तांडा येथील ऊसतोड मजुरी करणाऱ्या लिंबाजी राठोड यांना तीन अपत्य असून सर्वात छोटा मुलगा योगेश हा पांगरी कॅम्प येथील संत भगवान बाबा विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता पोहण्यासाठी आपल्या काही मित्रासोबत तांड्याशेजारील खदानी मध्ये गेला दहा वाजले तरी मुलगा परत न आल्याने नातलगांनी शोध सुरू केला खदानी शेजारी असलेल्या त्याच्या कपड्यावरून खदानीतील 25 फूट खोल पाण्यात त्याचा शोध घेतला सकाळी 11 वाजता त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला परळी उपजिल्हा रुग्णालयात ज्ञवविच्छेदन करण्यात आल्यानंतर लिंबूटा तांडा येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले
Social Plugin