राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर
बीड जिल्ह्यातील भाजपाचा बालेकिल्ला ढासळण्याच्या मार्गावर?
आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
परळी शहर व तालुक्यातील सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण न होणे सर्वसामान्यांची कामाबाबत सतत होत असलेली दिरंगाईमुळे , भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे परळीतील वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त भाजपा नेते राजसाहेब देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संधी दिल्यास परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी नेहमीच पंकजाताई मुंडे यांच्यासारख्या सक्षम ओबीसी नेत्यांना डावलण्याचे काम केले आहे.
मात्र या तालुक्यात भाजप मध्ये सगळं काही अलबेल होते आहे.
त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचे कामे होत नव्हती. बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम ताई मुंडे यांच्या समवेत प्रामाणिकपणे काम केले. परंतु आता तशी परिस्थिती बदलली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांची तीन वेळा भेट घेतली आहे. तसेच मतदारसंघातील सर्व माहिती त्यांना देण्यात आली आहे. तसेच धनगर, मराठा, बहुजन समाजाला पवार साहेबांनी आता संधी द्यावी अशी ही विनंती करण्यात आली.
मी जन्मच पुरोगामी पक्षात झाला आहे. त्यामुळे परत एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळालो आहे.
परळी शहरात परिस्थिती कोणत्या दिशेने चाललेली आहे. हे सर्वांना माहीत आहे. परळीतील सर्वसामान्य सर्वांच्या प्रश्नासाठी न्याय मिळावा म्हणून आपण लढणार असून एक सर्वसामान्यांचा समाजसेवक म्हणून हीच माफक अपेक्षा आहे.
बीड जिल्ह्यातून अनेक नेते आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपा, बीड जिल्ह्यात शिल्लक राहते की नाही हा प्रश्न आहे असेही राजेश देशमुख यावेळी बोलताना म्हणाले. भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवल्याचे ते म्हणाले.
दरम्यान राजेश देशमुख यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र आता शरद पवार कोणाच्या गळ्यात उमेदवारी घालतात हे दोन दिवसात स्पष्ट होईल.
हे ही बातमी वाचा....अजूनही परळी वेटिंग वर | शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर सस्पेन्स वाढला..*
🔴🔴👉👉👉👉
*https://aplaepaper.blogspot.com/2024/10/blog-post_50.html*
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा* *#हेडलाईन*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*
*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*
*दैनिक लोकप्रश्न परळी प्रतिनिधी*
*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*
https://aplaepaper.blogspot.com/2024/10/blog-post_50.html


0 टिप्पण्या