Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सोमेन्द्र वीरेन्द्र शास्त्रीअंतरराष्ट्रीय योग खेळात स्वर्णपदकाचे दुसऱ्यांदा मानकरी ठरले

 आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 








अंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा 29 जून 2024 नेपाळची राजधानी काठमांडू येथील बोगन व्हिला हॉलमध्‌ये संपन्न झाली. या स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेतेपद सोमेंद्र शास्त्री यांना प्राप्त झाले. 

पहिल्या स्पर्धेत रिदमिक योगा व दुसरच्या स्पर्धेन ट्रेडिशनल योगा होता. ज्यात विभिन्न वयाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. चि सोमेन्द्र वीरेन्द्र शास्त्री याने 20 ते 25 या वयोगटातील ट्रेडिशनल योगा आणि रिदमिक योगा दोन्हींत भाग घेतला होता. त्यांच्या नियमित आसन अभ्यास व सातत्य योगाभ्यासाने अंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेच्या स्वर्णपदकाचे दुसऱ्यांदा मानकरी ठरले. 

या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, तरीही परळी येथील विद्या नगर भागातील रहिवासी प्रा. डॉ.वीरेन्द्र कुमार शास्त्री व सौ. वीरवी शास्त्री यांच्या सुपूत्राने सुवर्णपदक मिळवून फक्त बीड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र व भारत देशाचे गौरव वाढविला आहे- त्याच्या या यशाबद्दल सर्वांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या