Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अनावश्यक खर्च टाळून वाढदिवस साजरा जि.प.चे आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांचा स्तुत्य उपक्रम

आपला ई पेपर/परळी वैजनाथ/ प्रतिनिधी 




तालुक्यातील संगम जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक नावंदे यांचा वाढदिवस आज बुधवार दिनांक 3 जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. जि.प.प्राथमिक शाळा संगम येथे वृक्षारोपण तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांना शालेय साहित्य वही पेन खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.केले. शाळेतील विद्यार्थी व शाळेच्या अङचणी जाणून घेतल्या. शाळेच्या अङचणी सोडवण्याचा प्रयत्न व मदत केली जाईल. तसेच सर्वानी वाढदिवस साजरे करताना समाजिक उपक्रम राबवावेत अशी मनोकामना श्री अशोक नावंदे यांनी व्यक्त केली.

बीड जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक तथा जि प प्रा शा संगम शाळेचे मुख्याध्यापक अशोक नावंदे  हे आपला वाढदिवस दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व  खाऊ वाटप करून करत असतात. त्याचप्रमाणेच आज दि 3 जुलै 2024 रोजी ही त्यांनी स्वतःचा वाढदिवस इतर कुठलाही खर्च न करता विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून साजरा केला . दरम्यान या शाळेतील सर्व शिक्षकही आपला वाढदिवस अशाच प्रकारे इतर बाबीवर खर्च न करता शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून करत असतात.

विद्यार्थीही अशा उपक्रमामुळे शिक्षकांच्या वाढदिवसाची आठवण ठेवतात एवढेच नाही तर विद्यार्थीही आपल्या परिसरातील मिळणाऱ्या फुले , पाने यापासून पुष्पगुच्छ तयार करून आणतात व शिक्षकांचा आपुलकीने वाढदिवस साजरा करतात  तसेच शाळेच्या वतीनेही विद्यार्थ्यांना वही, पेन, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचाही वाढदिवस नियमितपणे साजरा केला जातो. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या सर्व उपक्रमात शिक्षक सर्वश्री महादेव गित्ते सर,सुभाष कोंकेवाड सर,शिक्षिका श्रीमती कल्पना बडे मॅडम, श्रीम.बबिता शिंदे मॅडम यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या