Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राज्यस्तरीय कुराश क्रीडा स्पर्धेत पोदार स्कूलचा विद्यार्थी दीपक गीतेचे घवघवीत यश, स्पर्धेत मिळाले सुवर्णपदक

राज्यस्तरीय कुराश क्रीडा स्पर्धात दीपक गीतेला मिळाले महाराष्ट्र राज्यात प्रथम पारितोषिक



आपला ई पेपर/ परळी / प्रतिनिधी
पुणे जिल्हात इंदापूर येथे शाह सांस्कृतिक हॉल, पुणे (महाराष्ट्र) क्रीडा संकुल मैदानावर राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धा  नुकत्याच संपन्न झाल्या असून राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धा. 2024-25 यामध्ये दीपक गोविंदराव गीते याने 14 वर्षे वयोगटात 50 किलो खालील वजन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक(gold medal) मिळवल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच उत्तर प्रदेश येथील राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेसाठी त्यांचे निवड करण्यात आली आहे.


या राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धांत राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांने या स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी करत राज्यस्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे.  या स्पर्धेत यश मिळवल्यानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

14 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धात वयोगटातील 45 ते 50 किलो स्पर्धेत पोदार स्कूलचा विद्यार्थी दीपक गोविंद गीते याने सुवर्णपदक मिळवून राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळवले आहे. अशी माहिती क्रीडा शिक्षक सिताराम कराड यांनी दिली आहे. परळी शहर पोलीसात कार्यरत हेड कॉन्स्टेबल गोविंद गीते यांचा दीपक गीते हा मुलगा असून या खेळाडूचे अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्या मधु मॅडम व शिक्षक यांनी अभिनंदन केले.


या खेळाडूच्या नेत्रदिपक कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच मार्गदर्शक क्रिडाशिक्षक सूर्यकांत घोलप यांचे ही राजस्थानीज पोदार स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या