आपला ई पेपर | Parli | PODAR
शहरातील राजस्थानीज पोदार लर्न स्कूल मध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शाळेतील 900 पेक्षा जास्त विद्यार्थांनी शिस्तबद्ध आणि नियोजन पूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पाडली. विविध 10 पदांसाठी नामांकन दाखल केले होते,त्यासाठी आज मंगळवार दि.23 जुलै 2024 रोजी शाळेतील इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत मतदान केले.
लोकशाहीसाठी मतदान प्रक्रिया महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेत कोणकोणते पैलू वापरली जातात तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणांक सोबतच सामाजिक मूल्यांची जोपासना वाढण्यास मदत होईल.
या अनुषंगाने शाळेतील अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग सर, निवडणूक प्रक्रिया प्रमुख सौ रूपाली सावंत, सौ.सुजाता अहिरे यांनी विद्यार्थींना मतदानाचा रोड मॅप समजावून सांगितला आणि सर्वांगीण विकासासाठी समाजातील विविध समस्या कसे एकत्र चर्चा करून सामायिक करत सोडवल्या पाहिजेत. यावरही विद्यार्थ्यांची चर्चा झाली त्यात यावेळी मतदान प्रक्रियेशी निगडित विचारांचे आदान प्रदान करण्यात आले.
या आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावतानाचा तो आनंद, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
हा शाळेतील निवडणूक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
मोठी बातमी...
*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
Social Plugin