Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

छत्रपती संभाजी नगर येथील केंद्रीय युवा महोत्सवात महिला महाविद्यालयाचे सुयश

आपला ई पेपर/परळी प्रतिनिधी 

परळी येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. मानसी अलाट केंद्रीययुवा महोत्सवामध्ये उत्तुंग यश संपादन केले. संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल देशमुख संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख सचिव  रवींद्र देशमुख कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे यांनी तिच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले.

            

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , छत्रपती संभाजी नगर येथे ५ ते ७ ऑक्टोबर २०२६ यादरम्यान केंद्रीय युवा महोत्सव पार पडला.या युवा महोत्सवात मराठवाडा विभागातील बीड , धाराशिव , जालना व  छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयाचे विजयी स्पर्धक सहभागी झालेले होते.


या सर्व अत्यंत कुशल व आपापल्या कलेत निष्णात अशा स्पर्धकांना मात देत महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. मानसी अलाट हिने नकला (मिमिक्री) या कलाप्रकारात तृतीय पारितोषिक पटकावले.पारितोषिक वितरण समारंभाच्या मुख्य अतिथी सिने अभिनेत्री  नम्रता संभेराव यांनी मानसीला मंचावर बोलावून तिच्यासोबत नृत्यही केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी सुप्रसिद्ध पार्श्वगायक रवींद्र खोमणे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नम्रता संभेराव यांच्या शुभहस्ते तिला गौरविण्यात आले.

         

सदर महाविद्यालयाचे दोन संघ या युवा महोत्सवामध्ये सहभागी झाले होते. इन्स्टॉलेशन या प्रकारात स्नेहा हमिने, साक्षी देशमुख , संचिता आरसूळ आणि सोबत प्रीती सराफ याही या महोत्समहोत्सवात सहभागी झाल्या होत्या तर मिमिक्री या प्रकारात मानसी आलाट ही सहभागी झाली होती. या सर्वांचीच उत्तम तयारी सांस्कृतिक विभागाने करून घेतली होती.यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अरुण चव्हाण ,डॉ. पंढरी गुट्टे प्रा.सिद्धेश्वर कोकाट, डॉ. विद्या गुळभिले, डॉ. संगीता कचरे प्रा. तृप्ती तंवर व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या