Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प्रभू वैद्यनाथांच्या मंदिराची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली याही फुलांची आकर्षक सजावट होणार

*धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान कडून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण श्रावण महिना वैद्यनाथ मंदिरावर विद्युत रोषणाई व दर सोमवारी फुलांची होणार खास सजावट




*प्रत्येक सोमवारी भाविकांसाठी फराळाचीही व्यवस्था*

परळी वैद्यनाथ (दि. 03) - येत्या सोमवारपासून पवित्र श्रावण महिन्यात सुरुवात होत असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथांच्या मंदिराची राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने, ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्युत रोषणाईने आकर्षक सजावट करण्यात येत आहे. ठीक विद्युत रोषणाई संपूर्ण श्रावण महिना सुरू राहणार आहे.

त्याचबरोबर प्रत्येक श्रावण सोमवारी वैद्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यासह संपूर्ण मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे 21 प्रकारचे फुले वापरून खास फुलांची आरास व सजावट देखील करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण महिनाभर मंदिरात च्या परिसरामध्ये "ओम नमः शिवाय" या मंत्राचा निरंतर जाप करणारी ध्वनी प्रणाली देखील बसवण्यात येत आहे. 

प्रत्येक श्रावणी सोमवारी साबुदाणा खिचडी, राजगिऱ्याचे लाडू असा प्रसादही भाविकांना नाथ प्रतिष्ठानच्या वतीने वाटप करण्यात येणार असून येणाऱ्या सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांनी केले आहे. 

मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये तसेच शिवरात्रीच्या महोत्सवामध्ये धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून प्रभु वैद्यनाथांची अशाप्रकारे विशिष्ट सेवा केली जाते तसेच भाविकांसाठी वेगवेगळ्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या