Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पोदार स्कूल येथे मुलींच्या वाढत्या वयातील समस्या संदर्भात स्त्रीरोग तज्ञ सौ.डॉ. शालिनी कराड,सौ.डॉ सारिका गुट्टे यांनी केले मार्गदर्शन

आपला ई पेपर/परळी/प्रतिनिधी 


किशोरवयीन मुला-मुलींना वाढत्या वयात शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक बदला संदर्भात अनेक प्रश्न नेहमीच भेडसावतात असतात. त्या प्रश्नांवर आजही आई-वडील, शिक्षक अथवा अन्य कोणाशी मनमोकळेपणाने बोलले जात नाही किंवा मैत्रिणी सोबतही त्या गोष्टी शेअर करता येत नाहीत. अशा वाढत्या वयातील समस्या संदर्भात स्त्रीरोग तज्ञ सौ.डॉ. शालिनी कराड, सौ.डॉ सारिका गुट्टे यांनी आज दि.१ जुलै २०२४ (सोमवार) रोजी राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथील किशोरवयीन मुलींना वाढत्या वयातील विविध समस्या व उपाय बाबत सखोल मार्गदर्शन केले.


राजस्थानीज पोदार लर्न स्कूल शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत मुलींसाठी आज हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मुलीचे वाढते वय १० ते १९ वर्षे वयोगटातील हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.या काळात मुला-मुलींच्या अडचणी व समस्यांची जाणीव होऊन त्यांची


समाधानकारक उत्तरे मिळणे गरजेचे असते. त्यातून त्यांच्या भावी जीवनावर सकारात्मक परिणाम घडण्यास मदत होते.


याच उद्देशाने राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या उपस्थितीत किशोरवयीन मुलींना वाढत्या वया संदर्भातील असणाऱ्या विविध समस्या व उपाय बाबत मार्गदर्शन होण्यास मदत व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
आज डॉक्टर्स डे च्या निमित्ताने शाळेत निमंत्रित डॉक्टर सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर शालिनी कराड, सौ. डॉ सारिका गुट्टे, त्वचारोग तज्ञ सौ. डॉ. प्रियंका डोळे आघाव बाल रोग तज्ञ डॉक्टर उमेश मुंडे डॉक्टर अशोक कुमार थोरवे, आदींचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.








पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ही यावेळी करण्यात आली.



हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थीनी कल्याण समिती प्रमुख सौ.भाग्यश्री गुट्टे, सौ. सारिका शिंदे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या