Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी अंबाजोगाई घाटात संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे टिपलेले नयनरम्य छायाचित्रकार सुनील फुलारी यांच्या कॅमेरातून


श्री क्षेत्र शेगांव येथून तब्बल 30 /32 दिवसाचा प्रवास करून पंढरपूर येथे पोहोचणारी संत श्री. गजानन महाराज यांची  पालखी दिंडी वारकरी पायी चालत येतात... दरम्यान अगदी मध्यावर म्हणजे निघाल्यापासून पंधराव सोळा दिवसाच्या दिवशी ज्योतिर्लिंग परळी येथे सलग दोन मुक्कामी थांबून पुढील अर्धा प्रवास पूर्ण करण्यासाठी रवाना होतात.श्री पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ परळीतील एक मुक्काम श्रीराम मंदिर थर्मल पॉवर स्टेशन येथे व दुसरा मुक्काम परळीतील संत श्री जगमित्र मंदिर येथे असतो आज सकाळी सहा वाजता अंबाजोगाई कडे पालखीचे प्रयाण झाले दरम्यान कन्हेरवाडी इथून बालाघाटाच्या रांगाना सुरुवात होतात त्यातून जाताना आजूबाजूला डोंगर दऱ्या मधून असलेले या रस्त्यातून विहंगम दृश्य तयार होतात आणि वळणावळणाच्या या रस्त्यातून जाताना शुभ्र वस्त्र धारण केलेले एका शिस्तीने जाणारे हे वारकरी आणि त्यांच्या आसमंतात फडफडत वाऱ्यावर डौलाने डोलणाऱ्या भगवा पताका म्हणजे वेगळीच झाक दिसते.टाळांची किन... किन.. मृदंगाची थाप आणि नामाचा जप...  जय गजानन श्रीगजानन...माऊली माऊली  विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजराने आसमंत दुमदुमून  डोंगर दऱ्या वृक्ष वल्ली ही भक्तीमय होते. आणि या सोहळ्याचा महिमा किती आघात आहे याची प्रचिती येते.
या सोहळ्याचे छायाचित्रण करण्यासाठी गेल्या अकरा वर्षापासून परळीतील छायाचित्रकार व अंबाजोगाई येथील छायाचित्रकार येत असतात आज मी माझ्या कॅमेरातून काढलेली आहे काही छायाचित्र आपल्यासाठी












 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या