Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संत गजानन महाराजांच्या पालखीतील भक्तांना पोदार स्कूल च्या वतीने दैनंदिन उपयोगी साहित्याचे वाटप



 ..

आपला ई पेपर परळी /प्रतिनिधी 

शेगाव निवासी संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन आज परळी येथे झाले आहे. यावेळी गंगाखेड रोड असलेल्या राजस्थानीज पोदार स्कूलच्या वतीने या पालखीतील वारकरी भक्त मंडळींचे भक्ती भावाने स्वागत करण्यात आले.

दादाहरी वडगाव येथील दुपारचा विसावा घेऊन परळी शहराकडे आगमन करणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे राजस्थानी पोदार स्कूलच्या वतीने आज रविवार रोजी दुपारी  4 वाजता शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार स्वागत करण्यात आले.

 यावेळी वारकरी व भक्त मंडळी यांना दैनंदिन लागणाऱ्या खोबऱ्याचे तेल, पावडर, अंगाची साबण आदी दैनंदिन वापरात येणाऱ्या साहित्याचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक सेवाभाव या उद्देशाने वाटप करण्यात आले.

 यावेळी शाळेतील उपप्राचार्य लक्ष्मण पाटील, वैद्यनाथ कासार ,मंगेश ठाकूर शिक्षक किरण देशमुख, संजय भगत व शाळेतील महिला कर्मचारी व सुरक्षारक्षक आदींनी भक्ती भावाने शाळेतील प्रवेशद्वारावर त्यांचे स्वागत केले.