Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 



संस्कृती,संस्कार आणि दैनंदिन योग हे जीवनात महत्वपूर्ण -सुमेंद्र शास्त्री


आपला ई पेपर परळी प्रतिनिधी



सध्या मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मैदानी खेळ व्यायाम लुप्त पावत असून मुलांमध्ये मोबाईलचे वेड लागले आहे. यामुळे शरीर सुदृढ न राहणे, ब्रेन ट्यूमर या अशा अनेक समस्या वर एकच उपाय म्हणजे दैनंदिन व्यायाम होय.



आज दि 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे
विद्यार्थी व शिक्षक यांना आज सकाळी 8:30 ते 10 यावेळेत योगासने व योगाचे महत्त्व काय यावर निमंत्रित योग गुरु 
सुमेंद्र शास्त्री यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.


 विविध योगासनाचे फायदे सांगून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी अकॅडमीक डायरेक्टर .बी.पी सिंग, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील  व  शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन आजचा आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा केला.


दि. 21 जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून घोषीत केलेला आहे, राज्यात व जिल्हयात योग दिन मोठया प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्ताने पोदार लर्न स्कूल येथे इंटरनॅशनल योगा चॅम्पियनशिप मलेशिया गोल्ड मेडलिस्ट सुप्रसिद्ध योग शिक्षिक सुमेंद्र शास्त्री यांना निमंत्रित केले होते. यावेळी शिक्षिक शास्त्री यांनी बोलताना योगाभ्यासामुळे जीवनात किती बदल होतात, योग हे जीवनात किती महत्वपूर्ण आहेत याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
शाळेतील क्रीडा शिक्षक सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या