Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नाली बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम त्वरित कारवाई करावी अन्यथा मनसे करणार तीव्र आंदोलन


विकासाच्या नावाखाली परळी वैजनाथ शहर भकास करणारे नगर परिषद प्रशासन कधी जागे होणार? - वैजनाथ कळसकर

आपला ई पेपर परळी वै प्रतिनिधी 

शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या सराफा मार्केटसह शहरातील इतर भागांत नगर पालिकेने विकासाच्या नावाखाली शहर भकास करण्याचे सत्रच नगर परिषद प्रदासनाने सुरू केले आहे. गरज नसताना नाल्यांचे कामे सुरू करून कित्येक महिन्यांपासून नाल्यांचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. यानिमित्ताने नगर परिषद फक्त गुत्तेदाराचे पालन पोषण करत असल्याचे दिसत आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी केला आहे.

आता निवडणूक संपली आहे आणि आदर्श आचारसंहिता उठली आहे, हे खरे आहे, कोणत्याही अनुचित घटना टाळण्यासाठी पावसाळ्याशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्यावर संबंधित प्राधिकरणाचे हित लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. बरोबरच, गावातील पावसाच्या नाल्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषत: जेथे नाल्यांना स्लॅब कव्हर्सची आवश्यकता असते जेणेकरून बाधित नागरिकांना ओलांडणे सोपे होईल याचा विचार करणे आवश्यक आहे.

आज सराफा बाजारात महिला, आबालवृद्ध आदींना जाणे येणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे धंदे बसले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता नगर परिषद प्रशासनाने त्वरित नाल्यांचे कामे पूर्ण करावेत जेणेकरून सर्वांची सोय होईल. अन्यथा, नगर परिषद प्रशासनातील मुख्याधिकारी असोत किंवा नगर रचनाकार या कामाशी संबंधित सर्वांना त्याच गटारातील घाणीने आंघोळ घालत तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा मनसे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन दिला,याप्रसंगी व्यापाऱ्यांसह मनसैनिक उपस्थित होते.



*राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन  उत्साहात साजरा* |
👇👇👇🔴🔴🔴 *https://aplaepaper.blogspot.com/2024/06/blog-post_72.html*

👇👇👇👇👇
🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*
*9422497533*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या