Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिंदफणा शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


पेट को हिलाओ ज्यादा, खिलाओ कम : 
योगगुरु दिगंबर तौर सिंदफणा शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा  


आपला ई पेपर माजलगाव प्रतिनिधी 



आपल्याला होणाऱ्या सर्व आजारांचे मूळ कारण हे आपले पोट असल्याने, पोट निरोगी ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी 'पेट को हिलाओ ज्यादा, खिलाओ कम' असा योगमंत्र योगगुरू दिगंबर तौर यांनी दिला. सिंदफणा पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगसत्रात त्यांनी हा संदेश दिला. 


 माजलगाव येथे सिंदफणा पब्लिक स्कूलमध्ये जागतिक योग दिन शाळेच्या सचिव मंगलाताई सोळंके आणि समन्वयक नीला देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सहभाग घेतला. सकाळी ७ वाजता शाळेच्या क्रीडांगणावर सुरू झालेल्या या कार्यक्रमात योग प्रशिक्षक श्री. दिगंबर तौर यांनी विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे योगाभ्यास केला. शाळेचे प्राचार्य अन्वर शेख म्हणाले, "योगामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारते. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये योगाची आवड निर्माण व्हावी हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे." प्राथमिक विभागाच्या योगसत्राचे संचालन पुरुषोत्तम सोळंके यांनी केले. अनेक पालकांनी  या उपक्रमाचे कौतुक केले. 

या कार्यक्रमासाठी प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम, शैक्षणिक विभाग प्रमुख जीबी ऑगस्टिन, सुनीता सुरवसे, धनंजय सोमवंशी, अर्चना जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा विभाग तसेच सांस्कृतिक विभाग यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन काळे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय ललिता सोळंके यांनी करून दिला. सांस्कृतिक विभाग प्रमुख सखाराम जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या