Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक यांची नियुक्ती, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची बदली!

आपला ई पेपर बीड प्रतिनिधी 


 लोकसभा निवडणुकीत बीड जिल्हा अत्यंत लक्षवेधी ठरला आहे. अशातच आता पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला आहे. निवडणूक निकालानंतर महिनाभरातच बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची बदली करण्यात आली आहे. 

दीपा मुधोळ यांनी त्यांच्या कार्यकाळात ग्रामस्थांचे अनेक प्रश्न सोडवले आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मुधोळ यांनी बीड जिल्ह्यातील वाढते बालविवाह रोखण्याचे कार्य केले आहे. 

अशातच दीपा मुधोळ यांच्या जागी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

 पाठक यांनी यापूर्वी बीड जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. अशातच आता त्यांच्यावर जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या