Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माजलगाव विकास प्रतिष्ठान तर्फे गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप

 आपला ई पेपर माजलगाव प्रतिनिधी


येथील माजलगाव विकास प्रतिष्ठान,  लोकनेते सुंदरराव सोळंके नागरी सहकारी पतसंस्था माजलगाव आणि सिंदफणा पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आधार प्रकल्पांतर्गत गरजु विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  

सविस्तर वृत्त असे की, माजलगाव विकास प्रतिष्ठान गेल्या २० वर्षापासून गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शैक्षणिक सहल, महिला मेळावा, दिवाळी फराळ वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आलेले आहे. प्रतिष्ठान द्वारे जवळ जवळ ४०० विद्यार्थ्यांना या वर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 

माजलगाव प्रतिष्ठानच्या सचिव नीला देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषणात प्रतिष्ठान करत असलेल्या कार्याचा अहवाल सादर केला. सुरेश भानप यांनी माजलगाव प्रतिष्ठान ने बालविवाह रोखण्यासंबंधी घेतलेल्या पुढाकाराने कौतुक केले. 

सुप्रसिद्ध उद्योजक तथा लेखक शरद तांदळे यांनी मुलांना या संधीचे सोने करावे असे सांगून तुमच्यातील काही जण भविष्यात यशस्वी अधिकारी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंगलाताई सोळंके आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, आधार प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कार्यात माझा सदैव हातभार राहील. 

भविष्यात या विद्यार्थ्यांना येणाऱ्या सर्व अडचणीमध्ये आम्ही मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी प्रदूमन भोसले, ऋतुजा अर्गडे, रोशनी उजगरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंगलाताई सोळंके,नीला देशमुख, सुप्रसिद्ध उद्योजक शरद तांदळे, लेखक अभिषेक अवचार , स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी सुरेश भानप, प्राचार्य अन्वर शेख, लोकनेते सुदंरराव सोळंके बँकेचे कार्यकारी अधिकारी सुहास सोळंके, महादेव वाघ उपस्थित होते.  

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकनेते सुदंरराव सोळंके पतसंस्थेचे सर्व कर्मचारी,  सिंदफणा पब्लिक स्कूल चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी तौर  तर आभार प्रभा गंगणे  यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या