Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिंदफणाचे प्राचार्य अन्वर शेख यांची सीबीएसई तर्फे प्रशिक्षक म्हणून निवड

 आपला ई पेपर बीड 


 सिंदफणा पब्लिक स्कूलचे प्राचार्य अन्वर शेख यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) नवी दिल्ली च्या प्रशिक्षण विभागात रिसोर्स पर्सन (प्रशिक्षक) म्हणून निवड झाली आहे. सेंटर ऑफ एक्सलेंस, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्या शिफारशीवरून ही निवड करण्यात आली.

 प्राचार्य अन्वर शेख हे बीड सहोदया स्कूल कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष असून त्यांना एक समग्र अभ्यासक, कुशल मार्गदर्शक आणि आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जाते. सीबीएसईचे बीड जिल्हा समन्वयक शीतल सर्वज्ञ यांनी म्हटले की, "या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यातील सीबीएसई शाळांचा दर्जा उंचावण्यास आणि शिक्षकांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत होईल." गेल्या दोन वर्षांपासून सिंदफणा पब्लिक स्कूल माजलगाव येथे कार्यरत असलेल्या अन्वर शेख यांनी शाळेचे नाव मराठवाडा, महाराष्ट्र आणि दिल्लीपर्यंत पोहोचवले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे सिंदफणा ही मायक्रोसॉफ्ट आणि टॅग यांच्यामार्फत देशभरात हायब्रीड लर्निंगसाठी निवडलेल्या सीबीएसई शाळांपैकी बीड जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे तसेच ते महाराष्ट्र शासन संचलित स्वच्छता मॉनिटर आणि 'माझी शाळा सुंदर शाळा' या उपक्रमांच्या विभागीय कार्यकारणीवर सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.

सिंदफणा पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, सचिव मंगलाताई सोळंके, तसेच बीड जिल्ह्यातील सीबीएसईच्या सर्व शाळांच्या प्राचार्यांनी अन्वर शेख यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या