Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने.. प्रा.गोविंद लहाने सन्मानित

आपला ई पेपर सोनपेठ प्रतिनिधी


सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी प्रिय प्रा. श्री गोविंद त्रिंबक लहाने यांना पद्मपाणि प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.

 सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. गोविंद लहाने हे एक विद्यार्थी प्रिय शिक्षक ,प्रसिद्ध साहित्यिक, वृक्षमित्र ,सर्वांना परिचित असणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्व सामाजिक, सांस्कृतिक ,साहित्य, 

पत्रकारिता या सर्व क्षेत्रात कार्य करणारे व मनमिळाऊ वृत्तीचे व्यक्तिमत्व असलेले ग्रामीण भागात शैक्षणिक जनजागृती, पर्यावरण जनजागृती ,नवोदित साहित्यिकांना मार्गदर्शन करणारे प्रा. गोविंद लहाने यांना 17 मार्च रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पद्मपाणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यामुळे प्रा.गोविंद लहाने यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. आजपर्यंत त्यांना सामाजिक, शैक्षणिक ,साहित्यिक क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तर' दुहिता 'हा त्यांचा कवितासंग्रह ही  प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या