Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत सक्तीची वसुली बंद करा, नाही तर तिव्र आंदोलन करू अश्विन मोगरकर


परळी नगरपालिकेकडुन ऐन दुष्काळात सक्तीची करवसुलीअगोदर सुविधा पुरवा,नंतर जप्ती करा म्हणत नागरीकांचे आंदोलन 

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी

 परळी नगरपालिकेकडुन शहरात पाणीपुरवठा वेळेवर न करणे,नाल्यांची सफाई व स्वच्छतेची कामे केली जात नसतानाही शहरात वसुली पथके नेमुन सक्तीची करवसुली केली जात आहे.नगरपालिकेने शहरात नागरीकांना जप्तीचा इशारा देणारी फलके लावली आहेत.गणेशपार भागातील नागरीकांनी रविवारी (दि.17 मार्च) एकत्रित येत नगरपालिकेच्या इशारा फलकाखाली आम्ही कर भरण्यास तयार आहोत परंतु अगोदर सुविधा पुरवा मगच जप्ती करा अशा आशयाचे फलक लावुन दुष्काळात सक्तीच्या वसुलीला कडाडून विरोध केला.सक्तीची वसुली बंद केली नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा अश्विन मोगरकर यांनी यावेळी दिला.

 परळी नगरपालिकेच्या शहरात वेगवेगळ्या भागात वसुली पथके नेमत पाणीपट्टी,घरपट्टी,इमारत कर व इतर करांचा भरणा करण्यासंदर्भात सक्ती करुन जप्ती करण्यात येत आहे.नागापुर येथील वाण धरणात 60 टक्के पाणीसाठा असताना वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही,पाईपलाईन फुटने नित्याचेच बनले आहे.गणेशपार भागातील नाल्यांची सफाई केली जात नाही.सफाई केली तर घाण कित्येक दिवस उचलली जात नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे.सध्या दुष्काळी परिस्थिती असताना नगरपालिकेकडुन सक्तीची वसुली करण्यात येत असल्याने नागरीकांतुन संताप व्यक्त होत आहे.गणेशपार भागातील संतापलेल्या नागरीकांनी सामाजीक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने लावलेल्या इशारा फलकाला पाणीपुरवठा सुरळीत करा,नाल्यांची सफाई करत वेळेवर कचरा उचलावा,नागपुर येथील वाण धरणात 60 टक्के पाणीसाठा असल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा मगच करवसुली करा मगच आमच्या दारात वसुलीला या अशा आशयाचे फलक लावत घोषणाबाजी करत आंदोलन केले.यावेळी गणेशपार भागातील अश्विन मोगरकर,जय जोशी,सचिन स्वामी,अर्जुन साखरे,अशोक धोकटे, सागर जोशी शिवा हलगे लिंबाजी कदम दादा, दीपक जोशी विनोद जोशी संजय स्वामी आदी नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या