Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED | लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष , नागरिक व मतदान केंद्रावर cctv द्वारा राहणार नजर


आपला ई पेपर||परळी प्रतिनिधी 

 PARLI BEED|आदर्श आचारसंहितेचे पालन करावे - उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर  

39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी 13  मे 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी व विविध पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवहान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा परळी उपविभागीय अधिकारी अमोल लाटकर यांनी केले .ते निवडणूकी संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 50 टक्के मतदान केंद्रावर प्रथमच वेब कॅमेरे बसविण्यात आले असून 13 मे रोजी होणाऱ्या मतदानावर करडी नजर ठेवली जाईल.

     यावेळी त्यांनी 39 PARLI BEED बीड लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 233 परळी विधानसभा मतदारसंघातील तयारीचा माहिती दिली.परळी विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत 323273 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत .यामध्ये एक लाख 69 हजार 244 पुरुष तर एक लाख 53 हजार 530 महिला आणि 3 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

    PARLI BEED लोकसभा निवडणुकीसाठी परळी विधानसभा मतदारसंघात एकूण 342 मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत .परळी तालुक्यात 165 परळी शहरात 82 तर अंबाजोगाई तालुक्यात 100 मतदान केंद्रांचा समावेश आहे .निवडणूक लक्ष ठेवण्यासाठी 29 विविध पथके तैनात करण्यात आले आहेत .1470 अपंग मतदार तर 85 वर्षांपुढील मतदारांची संख्या 5993 आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावे यासाठी 36 क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे नेमणूक करण्यात आल्याचेही लाटकर यांनी सांगितले.

    या पत्रकार परिषदेला तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर ,तसेच दुसरे नायब तहसीलदार अण्णासाहेब वंजारे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या