Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कौतुकास्पद कामगिरी बीड जिल्हा सायबर पोलिसांनी सायबर गुन्ह्यातील एक कोटी परत केले


सायबर पोलीसांमुळे 1 कोटी मिळाले परत; दीड कोटींची रक्कम होल्ड

आपला ई पेपर बीड 

■बीड जिल्ह्यात ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सायबर गुन्ह्यामध्ये अवघ्या एक वर्षात बीड जिल्ह्यातील नागरिकांचे तब्बल 4 कोटींची फसवणूक झाली आहे. सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीतून पुढे आलेला हा आकडा थक्क करणारा आहे. मात्र बीड सायबर पोलीसांनी या तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने तपास करत वर्षभरात 98 लाख 28 हजार 598 रुपये परत मिळवत त्या रक्कमा  संबंधित तक्रारदारांच्या खात्यावर जमा केल्या. तसेच 1 कोटी 62 लाख 76 हजार 734 रुपये एवढी रक्कम होल्ड केली गेली आहे. जिल्ह्यात 1 जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या एक वर्षात ऑनलाईन फसवणूकीच्या 552 तर चालू 2024 वर्षीच्या फेबु्रवारी अखेरपर्यंत 63 तक्रारी प्राप्त झाल्या. याबोबरच 2023 मध्ये सोशल मीडिया संदर्भात 238 व मागील दोन महिन्यात 12 तक्रारी प्राप्त झाल्या. सायबर जनजागृती सातत्याने केली जाते;मात्र इतके सारे होत असतानाही अनेकदा सुशिक्षीत लोकांची सायबर भामट्यांकडून ऑनलाईन फसवणूक होत असल्याचे दिसते.

■■■■■■■■■■■■■■■■

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या