Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत महाशिवरात्रीनिमित्त पंचमुखी महादेव मंदिरकडे जाणारा रस्ता बंद करू नये संजय कुकडे व भाविक भक्तांची मागणी


Apla e Paper परळी प्रतिनिधी


महाशिवरात्री उत्सव येत्या 8 मार्च रोजी आहे. यानिमित्त परळीसह देशभरातून लाखो भाविक भक्त प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येत असतात. श्री वैद्यनाथ मंदिर परिसरात असणारे प्राचीन व जागृत देवस्थान असलेले पंचमुखी महादेव मंदिराकडे ये-जा करण्यासाठी असलेल्या

 रोडवर बॅरीकेटस् व बांबु महाशिवरात्री दिवशी लावून रस्ता बंद करण्यात येतो. यामुळे परळी शहरातील भाविक भक्तांना पंचमुखी महादेवाचे दर्शन घेण्यापासून वंचित रहावे लागत असते. मंदिर प्रशासन व पोलिस प्रशासनाने वैद्यनाथ गल्लीतील 

प्राचीन व जागृत देवस्थान असलेल्या पंचमुखी महादेव मंदिर रोडवर बॅरीकेटस् व बांबु लावू नयेत अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी नगरसेवक संजय कुकडे यांच्यासह भाविक भक्तांंनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

परळी शहरातील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले वैद्यनाथ गल्ली येथील पंचमुखी महादेव मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन व जागृत असल्याने येथे भाविक भक्त मोठया प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्री दिवशी या मंदिराच्या रोडवर प्रशासनाच्या वतीने बॅरीकेटस् व बांबु लावण्यात येतात. यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. महिला भाविकांना यामुळे त्रासाला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेवून प्रशासनाने या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी बॅरीकेटस् व बांबु लावू नयेत अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी नगरसेवक संजय कुकडे यांच्यासह भाविक भक्तांनी केली आहे.




परळीत राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल येथे राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह साजरा*      

👇💫💥👇💫💥
*https://aplaepaper.blogspot.com/2024/03/blog-post_5.html*

👇👇💥💥💫💫

*Breaking News*

*https://aplaepaper.blogspot.com/2024/03/blog-post.html*

*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या