आपला ई पेपर|परळी वैजनाथ प्रतिनिधी
महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रथमच बर्फाचे शिवलिंग अमरनाथजींचे दर्शनाचा लाभ घेता येणार
असून या दर्शनाचा लाभ परळी शहर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठया संख्येने घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
परळी शहरात पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे मंदिर असून महाशिवरात्रीचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील पंचवटीनगर, जुने पावर हाऊसच्या समोर, वैद्यनाथ मंदिर रोड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने
शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत बर्फाचे शिवलिंग अमरनाथजींचे दर्शन भाविक भक्तांना घेता येणार आहे. दरम्यान सकाळी 8 व सायंकाळी 7 वाजता आरती होणार आहे.
या दर्शनाचा लाभ परळी शहर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठया संख्येने घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Social Plugin