Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वीरशैव लिंगायत समाजचे नवनिर्वाचित राज्यसभा खा. अजित गोपछडे यांचा सत्कार संपन्न

 आपला ई पेपर परळी 


वीरशैव लिंगायत समाजचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार मा.डॉ.श्री.अजित माधव आप्पा गोपछडे यांची निवड झाल्याबद्दल समस्त परळीतील वीरशैव लिंगायत भजनी मंडळातर्फे तसेच जाणिव बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पहार घालून  परळी येथील सत्कार करताना

 श्री ष. ब्र.108 गिरगावकर महाराज तसेच श्रीमती गोदावरीबाई चौधरी, सौ. शिवकन्याताई स्वामी, सौ. चेतनाताई गौरशेटे, सौ रमाताई आलदे, श्रीमती आशाताई हरंगुळे, श्रीमती यमुना बाई हत्ते,सौ. अनुराधाताई बुद्धे, सौ. प्रभावतीताई हत्ते,श्रीमती पार्वतीबाई साखरे,सौ. प्रसन्नाताई संकाये, श्रीमती अलकाताई हुंडेकरी, सौ. शिवनंदाताई कोरे, सौ. मनिषाताई चौंडे यांनी सत्कार करून जाणीव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पुण्यात वीरशैव लिंगायत समाजाच्या मुलींसाठी वसतिगृह  व्हावे म्हणून निवेदन दिले.

 कलावंतांना मानधन मिळावे म्हणून श्री वैद्यनाथ भजनी मंडळ, संतश्रेष्ठ गुरुलिंग स्वामी भजनी मंडळ, श्री शंभु महादेव सेवाभावी भजनी मंडळ, शिवकन्या स्वामी भजनी मंडळ, श्री मन्मथ स्वामी भजनी मंडळ, हरिहर महिला भजनी मंडळ, मुक्ताई भजनी मंडळ, शनैश्वर भजनी मंडळ, सुर्वेश्वर भजनी मंडळ, श्री गजानन भजनी मंडळ, पद्मावती भजनी मंडळ, तसेच शिवशंकर भजनी मंडळाच्या वतीने  कलावंतांना मानधन मिळावे याकरिता निवेदन देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या