Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जो पर्यंत विधवा हे शब्द समाजातून नष्ट होणार नाही तोपर्यंत सामाजिक सुधारणा होणार नाही- नीला देशमुख

 


*Breaking News*|
*परळीत महाशिवरात्री निमित्त नयनरम्य प पंचम ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिराचे अद्भुत अशी छायाचित्र |👇💫💥

*https://aplaepaper.blogspot.com/2024/03/blog-post_20.html*

*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*



विधवांना सुद्धा जगण्याचा हक्क आहे : प्रमोद झिंजाडे 

आपला ई पेपर माजलगाव प्रतिनिधी

विधवांना सुद्धा समाजामध्ये जगण्याचा हक्क आहे असे प्रतिपादन विधवा महिला सन्मान अभियानाचे प्रवर्तक प्रमोद झिंजाडे यांनी केले. माजलगाव विकास प्रतिष्ठान व लोकनेते सुंदर राव सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. 

 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माजलगाव विकास प्रतिष्ठान तर्फे १२व्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीच्या मेळाव्याचा विषय 'विधवा प्रथा निर्मूलन' आणि 'मिळून सारेजण, करू विधवा प्रथेचे निर्मुलन' हे ब्रीद वाक्य होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रमोद झिंजाडे म्हणाले की, प्रत्येक महिलेने विधवा प्रथा निर्मूलनासाठी शांतता दुत म्हणून काम करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या सचिव नीला देशमुख यांनी केले. जेव्हा एखाद्या स्त्रीचा पती मरण पावल्यानंतर तिला विधवा म्हंटले जाते पण जर एखाद्या पुरुषाच्या पत्नीचे निधन झाले तर त्याला विधुर म्हणून कोणीही हिणवत नाही. जो पर्यंत विधवा आणि विधुर हे शब्द समाजातून नष्ट होणार नाही.

 तोपर्यंत सामाजिक सुधारणा होणार नाही, असे त्या म्हणाल्या... नवरा नसलेली स्त्री अशुभ आहे असे मानतात. तर मग बायको नसलेला नवरा अशुभ का मानला जात नाही? आपल्यावर पुरुष प्रधान संस्कृतीचा फार मोठा पगडा आहे. याची खंत व्यक्त केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मंगलाताई सोळंके यांनी माजलगाव विकास प्रतिष्ठान महिलांसाठी गेल्या १२ वर्षापासून काम करत आहे आणि पुढेही करत राहील, अशी ग्वाही उपस्थितांना दिली. 

यानंतर लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास सोळंके यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला. मेळाव्यामध्ये माजलगाव विकास प्रतिष्ठान च्या "दिशा परिवर्तनाच्या" या १२व्या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ज्या महिलांनी पुनर्विवाह केला आहे अशा महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. 

तसेच ज्या महिलांनी वेळेवर कर्ज फेड केली त्यांचाही सत्कार करण्यात आला.  मेळाव्यामध्ये उपस्थित महिला व पुरुषांना विधवा निर्मूलनासाठी शपथ देण्यात आली. कार्यक्रमात सिंदफणा पब्लिक स्कूलच्या मेस मध्ये काम करणाऱ्या मावशींनी विधवा निर्मूलन बाबतीत नाटिका सादर केली. तसेच 'डोळं माझं डोळं' आणि 'गावकीत आपल्या ठरलच हाय' या गीताचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. 

जान्हवी जाधव आणि संगीता जाधव या  महिला त्यांच्या स्वयंप्रेरणा ग्रूप मार्फत विधवांसाठी काम करत आहेत त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यासाठी अर्चना जाधव यांनी या दोघींची यावेळी मुलाखत घेतली. यावेळी महिलांच्या आरोग्य समस्या निवारणासाठी डॉ.अर्चना मोरे, डॉ. अंजली अकोलकर तसेच डॉ. अमर होरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच डॉ. मधुकर पात्रुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील टीमने उपस्थित महिलांची मोफत रक्त तपासणी केली. 

मेळावा यशस्वी होण्यासाठी लोकनेते सुंदरराव सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तसेच सिंदफणा पब्लिक स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यास परिसरातील अनेक महिला भगिनींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना धपाटे व समिना सय्यद यांनी केले तर रेश्मा सय्यद यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या