Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योगा प्रशिक्षिका सालासार यांनी केले मोलाचे मार्गदर्शन..

 


संस्कृती,संस्कार, योग हे जीवनात महत्वपूर्ण भूमिका आहे -शरद मुंडे 


आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 

राजस्थानी पोदर लर्न स्कूल मध्येदि ९ शनिवार रोजी आंतरराष्ट्रीय योगा प्रशिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पोदार लर्न स्कूल येथे विद्यार्थी व शिक्षक यांनी सकाळी 8 वा. यावेळेत योगासने व योगाचे महत्त्व काय यावर निमंत्रित आंतरराष्ट्रीय योगा प्रशिक्षक गलिदास सालासार व शरद मुंडे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. विविध योगासनाचे फायदे सांगून आंतरराष्ट्रीय पातळीवर योगा , प्राणायाम महत्त्वाची भूमिका बजावत आहे असे ही ते म्हणाले..


दि. 21 जून हा दिवस  "आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून घोषीत केलेला आहे. गत 05 वर्षापासून देशात, राज्यात व जिल्हयात योग दिन मोठया प्रमाणात साजरा केला जातो. 

 पोदार लर्न स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योगा प्रशिक्षक गलिदास सालासार व शरद मुंडे यांना निमंत्रित केले होते. यावेळी शिक्षिका गलिदास सालासार बोलताना सांगितले की, योगाभ्यासामुळे जीवनात किती बदल होतात, योग हे जीवनात किती महत्वपूर्ण आहेत याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

यावेळीअकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,प्राचार्य मंगेश काशीद , उपप्राचार्य लक्ष्मण पाटील  व  शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या