Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल येथे राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह साजरा

आपला ई पेपर | परळी प्रतिनिधी 


राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल येथे दरवर्षी ०४ मार्च ते ११ मार्च या कालावधीत "राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह "साजरा केला जातो. त्याप्रमाणे यावर्षी या कालावधीत "५३ व्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह" निमित्त
 औ.वि केंद्र परळी-वै चे




अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिभाऊ मैंदाड ,  (बीई (मेकॅनिकल), एम.टेक, सीएलआय, मुंबई ) जयवर्धन सूर्यवंशी सहाय्यक अभियंता यांच्यासह नॅशनल सेफ्टी कौन्सिलने पर्यावरणाच्या रक्षणासाठी संयुक्त विद्यमाने पोदार लर्न स्कूल येथे आज दि ५ रोजी राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह " साजरा जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सहसचिव  अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग, प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील हे उपस्थित होते.



सुरक्षितपणे काम करण्यासाठी जागरूकता आणि वचनबद्धता पसरवण्यासाठी दरवर्षी 4 मार्च रोजी भारतात राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. नॅशनल सेफ्टी कौन्सिलने पर्यावरण, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, वाहतूक सुरक्षा आणि मानवी आरोग्य सुरक्षेसह सर्व सुरक्षा नियमांबद्दल जनजागृती करण्यासाठी  केली. 


News PODAR in school 



या दिवसाचा उद्देश सार्वजनिक आणि कर्मचाऱ्यांना वर्षभर सुरक्षितपणे काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. आजचा हा कार्यक्रम सुरक्षा प्रोटोकॉल आणि स्कूल व बाहेरील कार्यस्थळावरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांवर प्रकाश टाकणारा असून या वेळी उपस्थित विद्यार्थीना हे मार्गदर्शन मोलाचे योगदान ठरणारा आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या