Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्केटिंग संगीत खुर्ची स्पर्धेत घवघवीत यश

 17 वी राज्यस्तरीय संगीत खुर्ची स्पर्धा शेगाव येथे संपन्न; 22 जिल्ह्यातील 500 विद्यार्थ्यांची उपस्थिती


 आपला ई पेपर/ परळी / प्रतिनिधी 

राजस्थानीज स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्केटिंग संगीत खुर्ची स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे.

शेगाव येथील मथुरा लॉन्स येथे दि. 3 व दि.4 फेब्रुवारी रोजी नुकत्याच सतरावे राज्यस्तरीय स्केटिंग संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत 22 जिल्ह्यातील 500 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

राजस्थानीज पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्केटिंग संगीत खुर्ची स्पर्धेत 10 वर्ष ते 12 वर्ष वयोगटात इयत्ता पाचवीचा आयुष जाधव, समरजीत मोकाशे, प्रणव चव्हाण, रुद्रंश आरसुळे यांनी यश मिळवले आहे.

यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करत शालेय समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले यावेळी सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील हे उपस्थित होते.

या यशस्वी खेळाडूच्या नेत्रदिपक कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच मार्गदर्शक प्राचार्य मंगेश काशीद सर,क्रिडाशिक्षक सूर्यकांत घोलप, सिताराम कराड यांचे ही राजस्थानी पोदार स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी अभिनंदन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या