Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिक्षकांच्या प्रतिभेला वाव देणाऱ्या संमेलनास शिक्षक-साहित्यिकांनी उपस्थित राहावे- प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे

 आपला ई पेपर/ परळी /प्रतिनिधी   


 शिक्षकांच्या  प्रतिभेला वाव देणाऱ्या 6 व्या  मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनास मराठवाड्यातील शिक्षक-साहित्यिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे स्वागत समिती सदस्य तथा लेखक, दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी केले आहे.

    आपल्या  शाळांमध्ये अनेक गुणी साहित्यिक, कवी, कलावंत शिक्षक आहेत. भाषा व कला विकासात आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व तसेच सर्वांगीण विकासात हे शिक्षक मोलाचे योगदान देत आहेत. या शिक्षकांच्या साहित्यप्रतिभेला आणि कलेला अधिकचा वाव मिळावा, 

लिहित्या हातांना मंच मिळावा या उद्देशाने साप्ताहिक शिक्षण मार्गचे संपादक-साहित्यिक रानबा गायकवाड यांच्या संकल्पनेतून ६वे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन ११फेब्रुवारी रोजी परळी वै येथे संपन्न होणार आहे. 

या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक-शिक्षण तज्ञ ए. तु. कराड असून उद्घाटन  आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त लेखक-दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांचे हस्ते होणार असून नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे स्वागत अध्यक्ष आहेत.

   शिक्षक व साहित्यिकांचा गौरव करण्यासाठी हे शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. शिक्षकांनी शिक्षकांसाठी भव्य स्वरूपात भरवले जात असलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच शिक्षक साहित्य संमेलन 

ठरणार असून मराठवाडा विभागातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा; कनिष्ठ महाविद्यालये,वरीष्ठ महाविद्यालयात कार्यरत असणारे शिक्षक,प्राध्यापक यात सहभागी होणार आहेत. 

   या शिक्षक साहित्य संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद आणि शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा यांचा समावेश असून ५०० हून अधिक शिक्षक यात सहभागी होणार असल्याचे प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या