Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत पोदार लर्न स्कूलमध्ये मातृ पितृ दिन उत्साहात साजरा ; आनंद अश्रू मध्ये भारावली पालक

 


व्हॅलेंटाइन मोडीत काढून आई‎ वडिलांविषयी प्रेम व्यक्त करत मातृ- पितृ‎ पूजन दिन साजरा‎ 

आपला ई पेपर/ परळी |प्रतिनिधी

पोदार लर्न स्कूल व श्री योग वेदांत सेवा समिती परळी सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.14 बुधवार रोजी पोदार लर्न स्कूलमध्ये सकाळी आयोजित मातृ- पितृ‎ पूजन दिन उत्साहात साजरा.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.उपस्थित पालकांचाही यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले


14 फेब्रुवारीव्हॅलेंटाइन डे मोडीत काढून आई‎ वडिलांविषयी प्रेम व्यक्त करत मातृ- पितृ‎ पूजन दिन उत्साहात साजरा झाला.यावेळी परळी व तालुका परिसरातील अनेक पालकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन मुलांच्या हस्ते , चिमुकल्या मुलांच्या हाताने शाळेत माता पिता यांचे पूजन करण्यात आले.


 या कार्यक्रमात मुलांनी आई-वडिलांसमोर आई वडिल व शिक्षक यांच्या संस्काराची शिदोरी म्हणून वेगवेगळ्या गीतातून नृत्य व कला सादर करत आई-वडिल व शिक्षकांच्या प्रति असलेले प्रेम व्यक्त केले. यावेळी उपस्थित पालकांनी मुलांमध्ये असलेले सुप्त गुण व कला पाहून मंत्र मुग्ध झाले.

 यावेळी पोदार लर्न स्कूलचे प्राचार्य मंगेश काशीद सर व्हाईस प्रिन्सिपल लक्ष्मण पाटील व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या