Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी जन्मोत्सव जल्लोषात साजरा | श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांचे आशिर्वचन

 

आपला ई पेपर| परळी वैजनाथ | संतोष जुजगर


मन्मथ आलासे भुलोकीच्या गजरात परळीत संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी जन्मोत्सव जल्लोषात साजरा

श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांचे आशिर्वचन


महिलांची लक्षणिय उपस्थिती; वीरशैव समाजाचा उपक्रम; महाप्रसादाने सांगता

येथील श्री  गुरूलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी) मध्ये विरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांचा जन्मोत्सव आज बुधवार दिनांक 14 फेबु्वारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.  प्रारंभी श्री जगमित्र नागा मंदिर येथून श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांची श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग येथे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा (जि.बुलढाणा) यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पूजा व महाआरती केली. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शेकडो महिलांनी पाळना म्हणला व पुजा केली.यावेळी श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा (जि.बुलढाणा) यांची प्रमुख उपस्थिती होती. संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामींचा जन्मोत्सवानंतर आरती झाली व प्रवचन झाले. यावेळी संत शिरोमणी मन्मथ स्वामींच्या कार्यावर श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा (जि.बुलढाणा) यांनी प्रकाश टाकला .

शोभायात्रेत वीरशैव लिंगायत समाजाच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. गुरूराज माऊली, श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय अशा जयघोषात ही शोभायात्रा निघाली. सोमवार दि.12 फेबु्वारीपासुन तीन दिवसीय परमरहस्य पारायण, प्रवचन, महाप्रसाद व धर्मसभेस प्रारंभ झाला होता. आज बुधवारी  श्री सिध्दलिंग चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा (जि.बुलढाणा) यांचे आशिर्वचन झाले. तसेच  या तिन्ही दिवशी कार्यक्रमात विविध महिला भजनी मंडळांचे शिवभजन संपन्न झाले. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी महिलांची प्रचंड संख्या होती. सकाळी पारायण दुपारी जन्मोत्सव व महाप्रसाद झाला व तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता  झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव लिंगायत समाज परळीच्या महिला, पुरूष व युवकांनी अथक परिश्रम घेतले.

*शिवनामात रंगला अवघा भक्तरंग

परळी हे वैद्यनाथ प्रभूंच्या वास्तव्याने पुणित झालेले शहर असून या शहराच्या कानाकोपर्यात नेहमीच कार्यक्रम होत असतात. त्यातही श्रीं च्या पायथ्याशी असलेल्या श्री गुरूलिंगस्वामी मठात नुकतीच संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास असलेली महिलांची मोठी उपस्थिती, भक्तीपूर्ण आणि ओजस्वी वाणीतील शिव प्रवचन यामुळे हा कार्यक्रम भक्तीरसात नान्हून निघाला. सातत्याने होणार्या शिवनामात अवघा भक्तरंग भरला गेला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल उपस्थित भाविकांनी संयोजकांचे आभार व्यक्त करण्यासोबतच असे कार्यक्रम मानवी जीवाला शुद्ध करण्यासोबत अंत:करणात श्रद्धेचे बीजारोपण करतात अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या