Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

संत गाडगे महाराज यांची जयंती स्वच्छता कर्मचाऱ्यां सोबत साजरी- वैजनाथ कळसकर

आपला ई पेपर / परळी प्रतिनिधी 



 महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जिजामाता गार्डन यंगर्स क्लब यांच्या वतीने संत गाडगे महाराज यांची जयंती स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या सोबत चहा घेत स्वच्छता विषयांवर चर्चा करत अनोख्या पद्धतीन साजरी करण्यात आली. 

       या वेळी बोलतांना मनसे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर असे म्हणाले की संत गाडगेबाबा सामाजिक सुधारणा, सामाजिक न्याय आणि स्वच्छता या विषयात रूची असणारे महाराज म्हणजे संत गाडगे महाराज. संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे असुन त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ साली अमरावती जिल्ह्य़ात झाला. तसेच बाबांनी आजवर नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, 

    कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या संत गाडगे बाबा महाराजांचा सेवाभाव आदर्श आपण अंगीकारला पाहीजे असे प्रतिपादन या वेळी बोलताना जिजामाता यंगर्स क्लब चे योग गुरू ॲड.रमेश साखरे यांनी केले.

यावेळी परळी नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी, तसेच जिजामाता गार्डन यंगर्स क्लब चे सदस्य ॲड. रमेश साखरे,मनसेचे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर, राम लटपटे, संतोष घोडके,निरज अग्रवाल, कांबळे मामा, फायरब्रीगेड चे आदोडे आदी उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या