Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

 



स्वातंत्रवीर सावरकर देशप्रेमी बरोबरच उत्कृष्ट साहित्यिक होते...डॉ मनिषा रोकडे

आपला ई पेपर परळी ll प्रतिनिधी

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर देशप्रेमीतर होतेच पण त्याचबरोबर उत्कृष्ट साहित्यिक होते असे प्रतिपादन डॉ मनिषा रोकडे यांनी केले.

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्वा.सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालिका छाया पत्की- देशमुख, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे व डॉ मनिषा रोकडे यांच्या हस्ते स्वा.सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 मान्यवरांच्या सत्कारानंतर मराठी विभाग प्रमुख डॉ राजकुमार यल्लावाड यांना ज्ञानज्योती बहुदेशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना डॉ मनिषा रोकडे म्हणाल्या की, सावरकरांनी जे साहित्य लिखाण केले ते सर्व क्रांतीकारक व देशासाठी होते. 

देश गौरवासाठीच साहित्य लिहिले यासंदर्भात स्वतः सावरकर म्हणाले होते की, मी जर क्रांतीकारक झालो नसतो तर साहित्यिकच झालो असतो मला याची खूप आवड होती असे यावेळी डॉ रोकडे यांनी सांगितले. यावेळी डॉ यल्लावाड, प्राचार्या डॉ देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रविण फुटके यांनी तर आभार प्रा प्रविण नव्हाडे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांना, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या