Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत बचपन स्कूलमध्ये चिमुकल्यांचा भरला आठवडी बाजार

 आपला ई पेपर परळी BACHPAN 


 बचपन स्कूल मध्ये रंगला आठवडी बाजार निमित्त होते चिमुकल्यांनी भरवलेल्या आठवडी बाजाराचे ‘भाजी घ्या, टॉमेटो घ्या, आले घ्या, कांदाभजी घ्या’ या आरोळ्यांनी  शाळेचे मैदानावर चिमुकल्यांचा आठवडी बाजाराने शाळेचा परिसर दणाणून गेले. 














सध्या डिजिटल युग असून या युगात मोबाईल द्वारे किंवा कुआरकोड चे ज्ञान व नेट बँकिंग संबंधातही विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.



 तसेच बालवयातच व्यवहारिक ज्ञान मिळावे, फळभाज्या, रानभाज्या, पालेभाज्यांची ओळख होण्यासाठी बचपन स्कूलमध्ये  आठवडा बाजार भरविला होता


लहान मुलांनी बाजारात भाज्या, फळे, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. काही मुलांनी आणलेल्या मिसळ, वडापावसह विविध पदार्थांचा खवय्यांनी आनंद लुटला. 

बाजारात खरेदीचा आनंद घेत विद्यार्थी व पालकांनी आठवडी बाजारप्रसंगी शाळेत उपस्थित पालकांनी या आठवडी बाजाराचा आनंद घेत मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले.

यावेळी बचपन स्कूलच्या  सर्व पालक ध शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागाने हा कार्यक्रम यशस्वी झाला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या