Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजर्षी शाहू पतसंस्थेचे कॅशियरवर बंदुक रोखून 39 लाख रुपये घेऊन चोर फरार

Breaking news परळीत आज..*मराठा आरक्षण साठी परळीत छत्रपती संभाजी महाराज चौकात रस्ता रोको करण्यात आले होते दोन किलोमीटर पर्यंत ट्राफिक जाम
केला होता.पंरतु तीन तास नंतर सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली.

परळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत.. 
;पोलीसांच्या बंदोबस्तात 
शांतते पार पडले

आपला ई पेपर | परळी | प्रतिनिधी
 राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातले उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परळी सकळ मराठा समाजाच्या वतीने उभ्या महाराष्ट्रात चक्का जाम , बंदची हाक देण्यात आली आहे. याच अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा परळी वैजनाथ यांनी  दि 16 फेब्रुवारी रोजी परळीत चक्काजाम आंदोलनाची ही हाक देण्यात आली होती. तीन तास चाललेले या आंदोलनाला पोलिसांच्या बंदोबस्तात पार पडले.
*





आपला ई पेपर अंबाजोगाई 


बीड जिल्ह्यात बँक आणि मल्टीस्टेट  यांच्या अनेक बातम्यांनी जिल्ह्यात वातावरण आर्थिक व्यवहार ढवळून निघालेले असताना आंबेजोगाईत पतसंस्थेतील कॅशियरला लुटल्याची घटना नुकतीच घडली आहे.

दिवसभरातील कामकाजात जमा  संपूर्ण रोकड, पतसंस्थेत जमा झालेली रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी निघालेल्या कॅशियरला तीन चोरट्यांनी रस्त्यात अडवून पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्या जवळील जवळपास 39 लाख रुपयांची रक्कम लुटल्याची घटना अंबाजोगाईत शुक्रवारी रात्री घडली.

प्राथमिकसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरात असलेल्या राजर्षी शाहू पतसंस्थेचे कॅशियर गणेश देशमुख हे शुक्रवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास दैनंदिन कामकाज आटोपून दिवसभरात जमा झालेली जवळपास 39 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सेवकासोबत दुचाकीवरून निघाले होते. 

Breaking News...आज परळीत 


ते मुकुंदराज कॉलनीत आले असता त्यांच्या पाळतीवर असलेल्या तिघा चोरटयांनी त्यांना अडविले. स्वतः जवळील पिस्तूल काढून त्यांनी ती देशमुख यांच्या डोक्याला लावली. पिस्तूल आणि त्यासोबत चाकूचा धाक दाखवून त्यांनी देशमुख यांच्याकडील 39 लाख रुपये रक्कम ठेवलेली बॅग घेतली आणि पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, भर वस्तीत घडलेल्या या घटनेने शहरातखळबळ उडाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या