Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कु.खुषी पवन पनपालिया सी.ए परिक्षेत उत्तीर्ण


आपला ई पेपर/परळी / प्रतिनिधी 

शहरातील वल्लभ नगर येथील रहिवासी पवन पनपालिया यांची मुलगी खुषी पवन पनपानिया सी.ए. परिक्षेत वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशाबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.          

नुकताच सी.ए. परिक्षेचा निकाल लागला आहे. या परिक्षेत परळी येथील वल्लभ नगर येथील खुषी पनपानिया ही ४१७ गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. खुषी पनपालिया ही सुरुवाती पासुन अभ्यासात हुशार होती.

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत सुद्धा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, कु. खुशीने या सीए परीक्षेत सुद्धा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने यश मिळवले आहे. इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण परळी येथील भेल शाळेत झाले आहे. अकरावी व बारावी पर्यंतचे शिक्षण लातुर येथे झाले आहे. बीकॉम पुणे येथे झाले आहे. तसेच तीचे सी ए होण्याचे स्वप्न पहिल्याच प्रयत्नात पुर्ण केले आहे. तीच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या